ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर रोज काही नी काही चर्चा होत आहेत। त्यासंबंधाने लिखाण होत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी संस्था पुढे सरसावत आहेत. या उपक्रमात आता खारीचा वाटा उचललाय तो महाराष्ठ्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’ने. ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयावर तीन खंडांचा ‘कुमार विश्वकोश’ प्रकाशित करण्यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळ सज्ज झालं आहे. शालेय स्तरावरील मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावं, यासाठी प्रकाशित केल्या जाणा-या या तिन्ही खंडात आकर्षक रंगीत चित्रांचा समावेश केला जाणार आहे।
प्रथम : यशश्री कांबळी फायनल इयर (जे.जे.आर्ट)
विश्वकोश म्हटला की हजार-हजार पानांचा एखादा जाड, जाडसा ग्रंथच डोळ्यासमोर उभा राहतो। त्यातील नोंदी माहितीवर्धक असल्या तरी ती हजार पान वाचायची म्हणजे, कधीतरी चुकुन पुस्तक डोळ्यासमोर धरणा-यांच्या कपाळाला आठयाच पडणार. ‘कुमार विश्वकोश’ हा नियमित विश्वकोशाच्या सर्वसाधारण कल्पनेला छेद देणारा असणार आहे. हा विश्वकोश 12 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असल्याने पाहताक्षणीच मुलांना तो हाती घ्यावासा वाटेल, अस त्याचं रुप असणं आवश्यक होत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर विश्वकोशाच्या मुखपृष्ठासाठी स्पर्धा घोषित करण्यात आली होती। जे.जे. अप्लाईड आर्ट, रचना संसद यांसारख्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत जे.जे. अप्लाईड आर्ट फायनल इयरची विद्यार्थिनी यशश्री कांबळी हिने पहिला क्रमांक पटकावला. तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे तारिणी दीक्षित, नम्रता गोसावी यांनी मिळवला. जयसिंग महेंद्र, अजयकुमार कडले, मानसी पारिख या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली।
बुधवारी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचं प्रदर्शन प्रभादेवी येथील रवींद्र
नाटयमंदीरात आयोजित करण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठाचे जीव विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. संजय देशमुख, स्लीप स्पेशालिस्ट डॉ. अभिजीत आणि प्राजक्ता देशपांडे, कर्णबधिर मुलांच्या शाळेच्या विश्वस्त डॉ. लता पाटकर, रचनाच्या प्रचार्य डॉ. सविता खरात, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम, रवींद्रचे संचालक नाईकडे आदींनी या प्रर्दशनास उपस्थिती दर्शवली. याबाबत डॉ. वाड यांनी सांगितल की, हा विश्वकोश शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी असल्याने तो सोप्या भाषेत असावा, हा प्रमुख निकष होता. जीवसृष्टी चराचराला व्यापून टाकणारा विषय़ असल्याने त्यामध्ये सुंदर चित्रेही असली पाहिजेत, असा आमचा अट्टहास होता. हा खंड सुंदर करायचा तर त्यासाठी त्यांच मुखपृष्ठ ही तितकंच सुंदर असंण अभिप्रेत होत. एखाद्या नवोदित-तरुण कलाकाराच नककीच अधिक ताजं, आकर्षक असेल असं वाटल्यान, ही स्पर्धा घेतली होती. प्रथम क्रमांकाच चित्र मुखपृष्ठ तर द्वितीय क्रमांकाच चित्र मलपृष्ठासाठी असणार आहे।
यासाठी दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. इतर उत्कृष्ठ 24 चित्रांचा समावेश असलेली कालदर्शिका वा त्याची एखादी ‘चित्रमय जीवविज्ञान’ अशी माहितापुस्तिका तयार करावी, त्याचप्रमाणे या चित्रांवर आधारित चारोळ्याही कवींकडून करुन घ्याव्यात, असा डॉ. वाड यांचा मानस आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या सहकार्याने तयार केल्या जाणा-या या विश्वकोशाच्या पहिल्या खंडात 250 नोंदी तर दुस-या खंडात प्रत्येकी 300 नोंदी असणार आहेत. 31 डिसेंबर 2009 रोजी पहिला खंड व मल्टिमीडिया सीडी प्रकाशित केला जाणार आहे।
उत्तेजनार्थ

प्रथम : यशश्री कांबळी फायनल इयर (जे.जे.आर्ट)
विश्वकोश म्हटला की हजार-हजार पानांचा एखादा जाड, जाडसा ग्रंथच डोळ्यासमोर उभा राहतो। त्यातील नोंदी माहितीवर्धक असल्या तरी ती हजार पान वाचायची म्हणजे, कधीतरी चुकुन पुस्तक डोळ्यासमोर धरणा-यांच्या कपाळाला आठयाच पडणार. ‘कुमार विश्वकोश’ हा नियमित विश्वकोशाच्या सर्वसाधारण कल्पनेला छेद देणारा असणार आहे. हा विश्वकोश 12 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असल्याने पाहताक्षणीच मुलांना तो हाती घ्यावासा वाटेल, अस त्याचं रुप असणं आवश्यक होत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर विश्वकोशाच्या मुखपृष्ठासाठी स्पर्धा घोषित करण्यात आली होती। जे.जे. अप्लाईड आर्ट, रचना संसद यांसारख्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत जे.जे. अप्लाईड आर्ट फायनल इयरची विद्यार्थिनी यशश्री कांबळी हिने पहिला क्रमांक पटकावला. तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे तारिणी दीक्षित, नम्रता गोसावी यांनी मिळवला. जयसिंग महेंद्र, अजयकुमार कडले, मानसी पारिख या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली।
बुधवारी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचं प्रदर्शन प्रभादेवी येथील रवींद्र
उत्तेजनार्थ
0 comments:
Post a Comment